ठाणे

Bhiwandi : बागेश्वर बाबामुळे आयोजक अडचणीत; आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम भिवंडीत आयोजित करण्यात आला होता.

Swapnil S

भिवंडी : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम भिवंडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रात्री ११ पर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथे मागील काही महिन्यांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याप्रमाणे, रविवारी देखील भिवंडी येथील दिवे अंजुर भागात धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. धीरेंद्र शास्त्री हे या कार्यक्रमास येणार होते. त्यामुळे हे प्रवचन ऐकण्यासाठी विविध भागातून दोन ते तीन हजार नागरिक आले होते. तसेच पोलिसांनी या भागात बंदोबस्त तैनात केला होता. नियमानुसार, रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणतेही वाद्य वाजविण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्री ११ वाजेपर्यंत येथे कथा वाचनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी ध्वनीक्षेपक बसविण्यात आले होते.

या प्रकरणी नियमांबाबत लेखी सूचना देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड