ठाणे

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

नवी मुंबई : चिकन आणण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय मुलीसोबत ६३ वर्षीय अंडी विक्रेत्याने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : चिकन आणण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय मुलीसोबत ६३ वर्षीय अंडी विक्रेत्याने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. सफाउल इद्रिसमियाँ अन्सारी (६३) असे या अंडी विक्रेत्याचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या घटनेतील १० वर्षीय पीडित मुलगी पनवेल तालुक्यातील खारपाडा भागात राहण्यास आहे. पीडित मुलगी खारपाडा नाका येथील दुकानातून चिकन आणण्यासाठी गेली होती. पण दुकानदार नसल्याने पीडित मुलगी दुकानदाराची वाट पाहत त्याच ठिकाणी उभी होती. याचवेळी चिकन दुकानाशेजारी असलेल्या अंडी विक्रेता सफाउल अन्सारीने पीडित मुलीला दुकानात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यावेळी पीडित मुलीने आरडाओरड करून पलायन केले.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’