ठाणे

नवीन नोंदणीत युवा मतदारांचा टक्का घसरला; ४९ हजार ४३३ मतदारांची नावे यादीतून वगळली

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १८ ते १९ वयोगटातील मतदारांचा टक्का घसरल्याचे समोर येत असून त्यांची टक्केवारी १,०४ इतकी असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली

Swapnil S

धनंजय कवठेकर/ अलिबाग

रायगड जिल्ह्यात ५८ हजार २०३ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर ४९ हजार ३२२ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या २३ लाख १६ हजार ५१५ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १८ ते १९ वयोगटातील मतदारांचा टक्का घसरल्याचे समोर येत असून त्यांची टक्केवारी १,०४ इतकी असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यात ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत ५८ हजार २०३ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच ४९ हजार ४३३ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ८ हजार ७७० मतदारांची वाढ होऊन मतदारांची संख्या २३ लाख १६ हजार ५१५ इतकी झाली आहे. त्यानुसार १,७६८ पुरुष, ६,९६५ स्त्री मतदारांची आणि ३७ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९६२ वरून ९६६ इतके झाले आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत. त्यापैकी अलिबाग, श्रीवर्धन व महाड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे

युवा मतदारांची नोंद अत्यल्प

या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये युवा मतदारांची नोंद अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. १८ ते १९ वयोगटातील १३,४४० मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ वयोगटात १८,४९४ मतदारांची वाढ झाली आहे. तर ३६,५२४ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये १९,६५८ एकसारखे फोटो असलेले मतदार असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यांची तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत ६, ५१७ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तर मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले ९,३१४ मतदार आढळून आले, त्यांची सखोल तपासणी करून ३,१५९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार

Maharashtra Heavy Rain : ठाणे, रायगडसाठी 'रेड अलर्ट'