ठाणे

मलंगगडावर राजकीय रणधुमाळी! शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची

माघ पौर्णिमेच्या दिवशी मलंगगडावर पार पडलेल्या आरतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राजकीय तापमान वाढवले.

Swapnil S

उल्हासनगर : ऐतिहासिक मलंगगडाच्या मुक्तीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी दिलेली हाक आजही जिवंत आहे. परंतु, माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे पार पडलेल्या आरतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राजकीय तापमान वाढवले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मलंगगड गद्दारांच्या पायांपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे’ असे म्हणत शिंदे गटावर हल्लाबोल केला, तर ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी ‘हिंदुत्वाच्या नावावर फक्त देखावा करणारे येथे येतात’ असा आरोप केला. तसेच ज्याप्रमाणे पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी झाली. त्याप्रमाणे मलंग गडाला ही लवकरच मुक्ती मिळेल, असा दावा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केला. यामुळे मलंगडावर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पहावयास मिळाले.

मलंगगड हिंदू आणि मुस्लिम भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण असून, शिवसेनाप्रमुखांच्या काळापासून येथे माघ पौर्णिमेला आरती केली जाते. शिवसेनेच्या फूटीनंतर दोन्ही गट या दिवशी स्वतंत्रपणे शक्तीप्रदर्शन करतात. यंदाच्या माघ पौर्णिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मलंगगडावर हजेरी लावण्यासाठी आले होते. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे अंबादास दानवे, माजी खासदार राजन विचारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही आरतीला हजेरी लावली. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ‘मलंग मुक्तीच्या गप्पा मारणारे गद्दारांचे पायच मलंगगडाला लागतात. आता यांना येथे येण्यापासून मुक्ती देण्याची वेळ आली आहे,’ असा घणाघात त्यांनी केला. यावर प्रतिसाद देताना शिंदे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला लक्ष्य करत, ‘हे लोक फक्त देखावा करण्यासाठी येथे येतात. निवडणुका झाल्यावर हिंदुत्वाची पुडी खिशात ठेवतात. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व खरे आहे,’ असा आरोप केला. मलंगगडाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वावर सर्वच सहमत असले, तरी हा मुद्दा केवळ राजकीय चर्चेचा विषय ठरणार का, की प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पावले उचलली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

श्री मलंगगड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

दरवर्षीप्रमाणे श्री मलंगगड यात्रेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. येथील मलंगगड शिवसेना शाखेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विभाग प्रमुख किरण भोसले यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार राजेश मोरे, आमदार शांताराम मोरे, तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक महेश गायकवाड, रवी पाटील, अमोल पाटील, अरविंद मोरे, महिला पदाधिकारी लता पाटील, बंडू पाटील विकास देसले आदी सह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली मलंगड यात्रा उत्साहात पार पडते. या ठिकाणी अनेक महिला उपस्थित असून लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण योजना’ तुमचा हा भाऊ बंद होऊ देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५०० वर्षांनंतर राम मंदिर उभे राहिले. दुर्गाडीचा प्रश्न निकाली निघाला, विशाळगडावरील अतिक्रमण हटवले गेले. त्याचप्रमाणे मलंगगडालाही लवकरच मुक्ती मिळेल.

- आ. राजेश मोरे, शिंदे गट

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’