Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत (Photo-X/@PratapSarnaik)
ठाणे

Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत

उद्धवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Swapnil S

ठाणे : उद्धवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. याबाबतच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कळवल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर चुकीचे आरोप होत असताना गप्प बसणार नाही, असा इशारा सरनाईक यांनी दिला. मंत्रिपद टिकवण्यासाठी नेत्यांवरील आरोप सहन करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत, शिंदे आणि शिवसेनेविरोधात चुकीचे कथानक पसरवले जात असेल, तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्णेकर हत्या प्रकरणातील कथित १७ लाख रुपयांच्या व्यवहारावरून एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत; अन्यथा नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखाचा राजकीय फायदा घेऊन शिंदे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.कुटुंबीयांना तपासाबाबत शंका असल्यास त्यांनी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आपली बाजू मांडावी.
नरेश म्हस्के, खासदार

दिवाळी गोडवा! मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

महायुतीला ‘दे धक्का’! महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत

वृक्षतोडीविरोधातील आंदोलन तीव्र; ठाकरे सेनेची सोमवारी ‘कर्जत बंद’ची हाक, राज ठाकरे, जरांगे यांची साय डोंगरला भेट

टाटा समूहाचा विध्वंस केला जातोय; राहुल गांधी यांचा मोदी, शहांवर अप्रत्यक्ष आरोप, सीतारामन यांचा पलटवार

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश