संग्रहित छायाचित्र
ठाणे

कुळगाव-बदलापूरमध्ये ७० कोटींची मालमत्ता कर वसुली; गतवर्षीच्या तुलनेत ५६ टक्क्यांची वाढ; ऑनलाइन पद्धतीने १६.४५ कोटी रक्कम जमा

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे.

Swapnil S

विजय पंचमुख/बदलापूर

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा ७०.१३ कोटी इतक्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर वसूल झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमता कर वसुलीत ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीत १,३६,६७८ इतके मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी १.२१,६७१ मालमत्ता निवासी, १४,३६५ मालमत्ता वाणिज्य आणि ६४२ औद्योगिक आहेत. त्यानुसार नगर परिषदेची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील एकूण मागणी रक्कम रु.७७.३४ कोटी इतकी होती. त्यापैकी नगर परिषदेने ३१ मार्च २०२५ अखेर रक्कम रु.७०.१३ कोटी इतकी वसुली केली आहे. म्हणजेच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९०.६% कर वसुली करण्यात आली आहे. त्यापैकी ऑनलाइन पद्धतीने १६.४५ कोटी रक्कम नगर परिषदेकडे जमा झाली.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात नगर परिषदेमार्फत रक्कम रु.४५ कोटी कर वसुली करण्यात आली होती त्यानुसार मागील वर्षच्या तुलनेत तब्बल २५.१३ कोटी अधिक रकमेची वसुली करण्यात आली आहे.

मुख्याधिकाऱ्यांचे प्रयत्न

यंदा १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी कर विभागाला दिले होते.

सुरुवातीपासून मुख्याधिकारी स्वतः कर वसुलीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यासाठी फेब्रुवारी अखेरपासून मार्च अखेरपर्यंत विशेष वसुली मोहीम राबविली होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांची आठ वेगवेगळी पथके तयार करून त्यात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची नावे सूचना फलकांवर प्रदर्शित करणे तसेच मालमत्ता जप्तीसारख्या कारवाईचे निर्णय घेतले.

२७ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत भरारी पथकांनी १११ मालमत्तांची जप्ती केली. तसेच थकीत मालमत्ता कराच्या रकमेएवढ्या किमतीच्या मालमत्तांची अटकावणी केली. या मोहिमेदरम्यान जप्त किंवा अटकावणी करण्यात आलेल्या मालमत्तांची थकीत मालमत्ता कराची रक्कम रु.१,७१,६५,३९७ इतकी आहे. तसेच भरारी पथकांद्वारे थकीत मालमता कराची १०,३६,९३,९५३ इतकी वसुली करण्यात आली.

नवीन आर्थिक वर्षात देखील मालमत्ता कर वसुलीची व जप्तीची मोहीम सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर थकीत आहे त्यांनी थकीत मालमत्ताकराची रक्कम नगरपरिषदकडे तात्काळ भरणा करावी. थकीत मालमत्ताकराच्या रकमेपोटी ज्या मालमत्ता जप्त किवा अटकावणी करण्यात आलेल्या आहे. अशा मालमत्ताधारकांनी माहे एप्रिल २०२५ अखेर थकीत रकमेचा भरणा नगरपरिषदेकडे करावा अन्यथा जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या परवानगीने जप्त व अटकावणी केलेल्या मालमत्ताच्या जाहीर लिलावाची कार्यवाही करण्यात येईल.

- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत