गॅस दरवाढीविरोधात जनआक्रोश 
ठाणे

गॅस दरवाढीविरोधात जनआक्रोश; ठाणे, पालघर, कल्याणमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून निषेध

घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीबरोबरच पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ठाण्यात आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

Swapnil S

ठाणे : घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीबरोबरच पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ठाण्यात आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वाढत्या महागाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पश्चिम आशियातील इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच दरम्यान देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली असून अनेक भागांत सिलिंडरचा पुरवठा देखील कमी झाल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. आधीच महागाईच्या ताणाखाली असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना या परिस्थितीचा फटका बसत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला असून ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटविण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत आहे. हॉटेल व उपहारगृह व्यवसायालाही याचा फटका बसत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गॅस दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने दिल्यानंतर ठाण्यातही निदर्शने करण्यात आली. गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी “पोटात पडली आग पण, सिलिंडर झाला महाग” अशा घोषणांद्वारे कार्यकर्त्यांनी दरवाढीचा निषेध नोंदविला.

या आंदोलनात ठाणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान गॅस दरवाढ मागे घ्यावी व सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अमेरिकी तळांवर हल्ले सुरूच ठेवू; इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबांचे पहिलेच वक्तव्य, होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानहून आणण्याची याचिका फेटाळली; वारसाला न्यायालयात यावे लागेल, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

विधात्यानेच आपले रक्षण केले - डॉ. फारूक अब्दुल्ला

गॅस टंचाईमुळे लग्न सोहळे अडचणीत; हॉल व्यावसायिकांवर कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ