दीपक कुरकुंडे
ठाणे

आतापर्यंत ठाण्यात विक्रमी पाऊस; १२६८.९५ मि.मी. पावसाची नोंद

Swapnil S

ठाणे : जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने अखेर उशिरा का होईना, दमदार हजेरी लावल्याने ठाणेकर गारव्याने चांगलेच सुखावले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाने गतवर्षीच्या पावसाचा विक्रम मोडला आहे. आजपर्यंत १२६८.९५ मि.मी पाऊस पडला, तर २०२३ मध्ये याच कालावधीत १००१.६० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सलग पाऊस पडल्याने ठाणेकरांनी विकेंडचा आनंद लुटला.

शुक्रवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने रविवारीपर्यंत धुवांधार बॅटिंग केली आहे. या पावसामुळे वसंतविहार भागात दोन वृक्षांच्या पडझडीसह कापूरबावडी आणि मानपाडा येथील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनांचा खोळंबा झाला. तर, कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये गळती झाल्याचा प्रकार सकाळी प्रवाशांनी अनुभवला. सुदैवाने, या पावसामुळे कोणत्याही प्रकारची विशेष हानी झालेली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारी मुंबई-ठाण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, शुक्रवारपासून रविवारपर्यत २४ तासांत ७५.८६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

शनिवार रात्रीपासूनच पावसाने आक्रमक रूप धारण केले होते, त्यामुळे विकेंडच्या सहलीचा बेत केलेल्या चाकरमान्यांना पावसाचा चांगलाच आनंद घेता आला. सकाळी कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये देखील गळती झाल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. तर, घोडबंदर रोडवरील कापूरबावडी आणि मानपाडा परिसरात रस्त्यांवर जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक वाहने जागच्या जागीच थांबल्याचे चित्र दिसून आले. वसंतविहार भागात दोन ठिकाणी वृक्षांची पडझड झाली.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था