ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यात यंदा २५ हजार ५३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून, ठाणे महापालिका क्षेत्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीतून तब्बल ५ हजार ४७० अर्ज प्राप्त झाले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया १७फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च होती. या कालावधीत एकूण ११ हजार ७५४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. पालकांना अर्ज करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
यंदा सुरुवातीला शाळा निवडताना १ किलोमीटर अंतराची अट लागू करण्यात आल्याने अनेक पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अर्जाचा वेग मंदावला. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम झाला. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही अट शिथिल करण्यात आल्यानंतर अर्जाचा ओघ पुन्हा वाढल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातून मर्यादित प्रतिसाद शिथिल भागातील अपेक्षेपेक्षा कमीच अट ग्रामीण कल्याण, मुरबाड, शहापूर, केल्यानंतरही अंबरनाथ आणि भिवंडी प्रतिसाद तालुक्यांतून एकूण ८ हजार १९४ राहिला. अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले असून, मुरबाड तालुक्यातून केवळ २१५ अर्ज दाखल झाले आहेत.
एकूणच, अटींमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर अर्जाचा वेग वाढला असला तरी ग्रामीण भागातील सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाने अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन सोडत ६ एप्रिल रोजी
ठाणे : दरवर्षीप्रमाणे आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत (लॉटरी) सोमवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. ही सोडत संगणकीय प्रणालीद्वारे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून पात्र विद्यार्थ्यांची निवड याद्वारे करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या पालकांना सोडतीचा निकाल अधिकृत आरटीई पोर्टलवर पाहता येणार आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित महानगरपालिका शिक्षण विभाग किंवा तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला समान संधी मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. सोडत प्रक्रिया सुरळीत, विश्वासार्ह व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा मध्यस्थांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळ व शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे.बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)