ठाणे

आरटीओची डोंबिवली शहराकडे पाठ; सर्वेक्षणाचा नुसता दिखावा

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचबरोबर शहरात रिक्षांचे प्रमाण देखील वाढत असल्यामुळे आरटीओच्या नियमांना बगल देत अनधिकृत थांबा अथवा अधिक प्रवासी वाहतूक यामुळे डोंबिवलीत दिवसेंदिवस वाहतूककोंडीचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.

अधिकृत रिक्षा थांबा हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असताना अनधिकृत रिक्षा थांबाचा भरणा अधिक आहे, त्यामुळे या अनधिकृत रिक्षा थांब्यांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने अभय दिले आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. वर्षभर कधीही न दिसणारे हे आरटीओचे अधिकारी एकदाच सर्वेक्षणाच्या नावाखाली दिसतात त्यामुळे आरटीओ विभागाकडून दिखाव्याचे काम सुरू असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी साळवी यांनीही डोंबिवली शहराकडे कानाडोळा केला होता. आता प्रभारी अधिकारी रमेश कुल्लूरकर हेही साळवी यांच्याप्रमाणे सरकारी कारभार संभाळत असल्याने डोंबिवली शहरात आरटीओवर नागरिक नाराज असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या वर्षी डोंबिवलीत आरटीओने सर्वेचा दिखावा केल्याने अनेक रिक्षा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. डोंबिवली शहरात दिवसेंदिवस अनधिकृत रिक्षा थांबे वाढत असताना त्यावर आरटीओ कारवाई न करता त्यांना अभय देत आहे का? असा प्रश्न डोंबिवलीकरांनी उपस्थित केला आहे. कल्याण येथील कार्यालयातून डोंबिवली शहराची चर्चा करून प्रश्न सूटत नसून प्रभारी अधिकारी रमेश कुल्लूरकर् यांनी डोंबिवली शहरात एकदातरी पाहणी करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस कारवाई करत असून आरटीओ मात्र पाठ दाखवत असल्याने आरटीओच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

"आमच्यासोबत या, तुमची स्वप्नं पूर्ण होतील..."नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल

Madhuri Dixitनं खरेदी केली तब्बल 4 कोटी रुपयांची कार, फीचर्स ऐकून व्हाल चकित

अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य