ठाणे

घाटकोपर येथे इमारत दुर्घटनेची दुसऱ्या दिवशी दुसरी घटना

एकाच कुटुंबातील चार जखमी

नवशक्ती Web Desk

मुंबई : घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग खचल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रमाबाई आंबेडकर काॅलनीतील चाळ नंबर २१ तळ अधिक एक मजली बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर काॅलनी, आंबेडकर पुतळ्याजवळ, चाळ नंबर २१ ही तळ अधिक एक मजली आहे. पहिल्या मजल्याचा भाग सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. महादेव खिल्लारे (५०), सुनिता खिल्लारे (४२), रोहित खिल्लारे ( २३) व वैभव खिल्लारे (२०) हे एकाच कुटुंबातील आई वडील व दोन मुले असे चौघे जखमी झाले. चौघांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ओपीडीत उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत पहिल्याच पावसांत दुर्घटनांचे सत्र

मुंबईत शनिवारपासून सुरु झालेल्या पावसात दुर्घटनांचे सत्र सुरु असून मागील दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आला आहे. यात घाटकोपर व विलेपार्ले या दोन ठिकाणी इमारतीचा भाग कोसळून व गोवंडी येथे ड्रेनेज लेनमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिल्याच पावसांत सलग झालेल्या या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश