Shahapur : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा शोध सुरू 
ठाणे

Shahapur : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा शोध सुरू

मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Swapnil S

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

मेघराज वेखंडे (१९) आणि मदन वरकुटे (४४) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही वासिंद येथून दुचाकीवरून मुंबई-नाशिक महामार्गाने शहापूरच्या दिशेने येत होते. आसनगाव हद्दीत आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, याप्रकरणी शहापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता