Thane : भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची शिंदे सेनेची मागणी 
ठाणे

Thane : भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची शिंदे सेनेची मागणी

महासभेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रगीताच्या अवमानाच्या आरोपावरून शिंदे सेनेने भाजप नगरसेवकांनी पूर्वनियोजित कट रचून महासभेत गोंधळ घातल्याचा आरोप केला असून, मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Swapnil S

ठाणे : महासभेत झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रगीताच्या अवमानाच्या आरोपावरून शिंदे सेनेने भाजप नगरसेवकांनी पूर्वनियोजित कट रचून महासभेत गोंधळ घातल्याचा आरोप केला असून, मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

महासभेपूर्वी ठाणे महानगरपालिका महापौरांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वप्रथम लक्षवेधीवर चर्चा करणे, त्यानंतर विषयांवर निर्णय घेणे आणि शेवटी प्रश्नोत्तराचा तास घेणे असे सर्वानुमते ठरले होते, असा दावा शिंदे सेनेने केला आहे. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी विषयांवर निर्णय घेण्याची विनंती केली होती, मात्र भाजप नगरसेवकांनी सभात्याग, घोषणाबाजी आणि महापौरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर पक्षांच्या सदस्यांनी लोकहिताचे विषय मंजूर केले.

राष्ट्रगीताचा अवमान भाजप नगरसेवकांनीच केला असून, त्यानंतर दिशाभूल करण्यासाठी मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांच्यावर आरोप करण्यात आले, आहे. भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या दिशेने धाव घेतल्याच्या घटनेवर कारवाई करून संबंधित सदस्यांना निलंबित करण्याची मागणी मनोज शिंदे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट