एमएमआर क्षेत्रात महिला महापौरांची नियुक्ती; 'लाडक्या बहिणीं'ना शिंदेसेनेने दिली नेतृत्वाची संधी 
ठाणे

एमएमआर क्षेत्रात महिला महापौरांची नियुक्ती; 'लाडक्या बहिणीं'ना शिंदेसेनेने दिली नेतृत्वाची संधी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला प्रतिनिधित्वाला नवी दिशा देणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महिलांची महापौरपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

Swapnil S

फरियाल सय्यद / ठाणे

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला प्रतिनिधित्वाला नवी दिशा देणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महिलांची महापौरपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

या तिन्ही शहरांतील महापौरपदे यावेळी महिलांसाठी आरक्षित नसतानाही हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. पारंपरिक आरक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ‘लाडकी बहीण’ या महिला मतदारवर्गाला अधिक भक्कमपणे जोडून ठेवण्याच्या दृष्टीने ही एक रणनीतिक खेळी मानली जात आहे.

अलीकडील मनपा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेला नेतृत्व निश्चित करण्याची संधी मिळाली. त्यानुसार खालील उमेदवारांची महत्त्वाच्या नागरी पदांवर निवड करण्यात आली आहे.

  • ठाणे : शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड

  • कल्याण-डोंबिवली : हर्षाली थवील चौधरी

  • उल्हासनगर : अश्विनी निकम

रणनीतिक राजकीय बदल

महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्यामागील पुढाकार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा असल्याचे सांगितले जाते. निवडणुकांमध्ये महिलांनी दिलेल्या मोठ्या पाठिंब्याला थेट सत्तेत प्रतिनिधित्व देऊन उत्तर देणे आवश्यक असल्याचा त्यांचा आग्रह होता.

“सक्षमीकरणासाठी आरक्षणाच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही. आमच्या महिला पक्षकार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर आणि योगदानावर विश्वास ठेवून त्यांना संधी देणे, हीच आमची भूमिका आहे,” असे पक्षाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

ठाण्यापलीकडील वर्चस्व

मुंबई महानगरपालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या २९ नगरसेवकांपैकी १९ महिला आहेत. विशेष म्हणजे, युतीअंतर्गत लढवलेल्या ९० जागांपैकी ६३ जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. नगरपरिषदा : महाराष्ट्रभरातील विविध नगरपरिषद निवडणुकांमध्ये पक्षाने जिंकलेल्या ६० जागांपैकी ३३ ठिकाणी महिला नगराध्यक्ष निवडून आल्या आहेत.

शिवसेनेचा विश्वासाचा निर्णय

महिलांनी शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला आहेे. त्यांच्या कुवत, नेतृत्व क्षमतेवर विश्वास ठेवत त्यांना संधी देणे हीच समानतेची भावना आहे. महिलांना जबाबदाऱ्या देणे हा निर्णय प्रेरणादायी आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

वेळेआधीच मान्सूनची माघार; मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची घोषणा

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

'मविआ'त नाराजीनाट्य; काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी; नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश

तीन वर्षांतच खटल्यांचा निकाल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा; BNS ची पूर्ण अंमलबजावणी गरजेची