ठाणे

अत्याचाराची बाब उघडकीस येण्याच्या भीतीतून झाली हत्या

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करताना, मयत शोएब रशीद शेखने पाहिले होते. तो या संदर्भात लोकांना सांगेल, याच भीतीतून मशिदीमध्ये काम करणाऱ्या गुलाब उर्फ गुलाम रबा शेखने शोएबची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Swapnil S

ठाणे : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करताना, मयत शोएब रशीद शेखने पाहिले होते. तो या संदर्भात लोकांना सांगेल, याच भीतीतून मशिदीमध्ये काम करणाऱ्या गुलाब उर्फ गुलाम रबा शेखने शोएबची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. शोएबची गुलाब शेखने गळा दाबून हत्या केली होती. तसेच २०२३ मध्ये गुलाबवर अनैसर्गिक अत्याचार गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी त्याला उत्तराखंड येथून अटक केली असून येत्या १९ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

२०२० मध्ये भिवंडी नेहरूनगर परिसरातील शोएब शेख या अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यासह, २०२३ मधील अनैसर्गिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास ठाणे शहर पोलीस दलाचे मालमत्ता गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पोलीस नाईक सचिन कोळी यांना संशयित आरोपी गुलाब शेख हा उत्तराखंड जिल्ह्यातील रुडकीपासून काही अंतरावर असलेल्या मुक्कमपूर येथील मशिदीमध्ये स्वतःचे अस्तित्व लपवून बसला होता. त्यानुसार त्याला ठाणे शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. चौकशी दरम्यान गुलाब शेखने अपहरण झालेल्या शोएब शेखची हत्या केल्याची कबुली देत, त्याचा मृतदेह तो चालवत असलेला किराणाच्या दुकानाच्या गाळ्यामध्ये पुरल्याची धक्कादायक माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे त्या गाळ्यात खोदले असता, अपहरण झालेल्या मुलाच्या हाडाचे अवशेष मिळून आले. ते अवशेष तहसीलदार यांनी पंचनामा करून रासायनिक विश्लेषण करीत जप्त केले आहेत.

लालबागचा राजाच्या विसर्जनात ‘विघ्न’; तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री उशिरा विसर्जन

भटक्या विमुक्तांचा आभासी मुक्ती दिन!

भूपेनदा (डॉ. भूपेन हजारिका) यांना आदरांजली

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन