ठाणे

२२ जानेवारीला चिकन तसेच मद्यविक्री बंद ठेवा! शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख मोरे यांची विनंती

कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात अशा व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश द्या

Swapnil S

डोंबिवली : श्रीक्षेत्र अयोध्या धाम येथे श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवार, २२ जानेवारी रोजी होणार आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे संपूर्ण देशभर घरोघर मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. धार्मिक कार्य असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मांसाहारी दुकान व हॉटेल तसेच देशी व विदेशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केली आहे.

हे व्यवसाय सोमवारी बंद ठेवून श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास व हिंदू संस्कृती उत्सवास सहकार्य करावे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात अशा व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश द्या, अशी विनंती मोरे यांनी पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांना केली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस