ठाणे

बांगलादेशींविरुद्ध धडक कारवाई; भिवंडीतून ८ आणि खारघर, एपीएमसीमधून १० जण अटकेत, उल्हासनगरातून महिलाही ताब्यात

भारत - बांगलादेश सीमेवरून अवैधपणे भारतात येऊन भिवंडी तालुक्यात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विनापरवाना भाडे तत्त्वावर वास्तव करणाऱ्या आणखी ८ बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Swapnil S

भिवंडी : भारत - बांगलादेश सीमेवरून अवैधपणे भारतात येऊन भिवंडी तालुक्यात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विनापरवाना भाडे तत्त्वावर वास्तव करणाऱ्या आणखी ८ बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. यामध्ये ७ तरुणांसह एका महिलेचा समावेश आहे.

रफिक असमत शेख (४५), महमुदूल असमत शेख (२२), अन्सार शापीतअली चौधरी (३५), शिवली फिरोज विशेष (३३) अशी कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई अपार्टमेंटच्या धर्मनिवासमधून अटक केलेल्यांची नावे असून सुबुद्दा मुजिब शेख (३०), हैदर अमिनउल हक शेख (४२), जमाल जहूर शेख (४२), मोहम्मद भोरशेद दुलाल शेख (२६) अशी नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावातून ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.

उल्हासनगरातून महिला ताब्यात

राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणाऱ्या परदेशी नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धाडीत, बांगलादेशातून अनधिकृतपणे भारतात आलेल्या एका महिलेचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले असून तिच्यावर विदेशी व्यक्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर, एपीएमसीमधून १० जण अटकेत

खारघरमधील कोपरा गावात तसेच एपीएमसीतील कोपरी गावात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करून अटक केली. यात २ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश असून हे सर्व बांगलादेशी नागरिक बांगलादेशातून भारतात आल्याचे व तेव्हापासून ते या भागात वास्तव्यास असल्याचे चौकशीत समजले. हे सर्व बांगलादेशी नागरिक मजुरी आणि घरकाम करत होते.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश