ठाणे

संशयास्पद फिरणाऱ्यांना गावकऱ्यांनी पकडले

Swapnil S

उरण : मागील काही दिवसांपासून चिरनेर, कळंबुसरे गावात रात्रीच्या वेळेस चोर फिरत असल्याचे अनेकांनी पाहिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तरुणांनी पथके तयार करून रात्रीच्या वेळेस गावात गस्त घालण्यास सुरुवात केली होती. अशाच प्रकारे गस्त घालणाऱ्या तरुणांनी एका संशयास्पदपणे फिरणाऱ्या एका कारचा पाठलाग करून दोन संशयितांना शुक्रवारी रात्री पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गावकरी दहशतीच्या छायेखाली वावर आहेत.त्यात हातात लोखंडी रॉड, कटर, कोयता, सुरा या सारखं हत्यार घेऊन चोरांनी आपला मोर्चा हा चिरनेर, कळंबुसरे गावात वळवून रात्रीच्या सुमारास घरफोड्या करून घरातील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्या आहेत. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस सदर घटनेची दखल घेत नसल्याने आणि रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरल्याने गावातील तरुणांनी आपापल्या गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गनिमी काव्याने 'जागते रहो'चा नारा देत परिसरात गस्त सुरू केली आहे.

शुक्रवारी ( दि. १९) रात्रीच्या सुमारास एक गाडी रस्तावर संशयितरीत्या फिरत असताना तरुणांना दिसली. ती थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ते पळून जाऊ लागले. त्यानंतर त्यांचा पाठलाग करत असताना ही संशयास्पद गाडी टाकीगाव स्टॉप जवळ बंद पडली. त्यानंतर त्यातील दोघांना पकडले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्यासोबत आणखी व्यक्ती असल्याचे सांगितले. त्यानंतर या संशयिताना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे; मात्र या दरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेली गाडी अज्ञातांनी जाळून टाकली. पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून ही आग विझविली आहे. दरम्यान, हे पकडलेले संशयित घरफोडी करणारे चोर आहेत की, रात्रीच्या वेळी भंगार पळवणारे चोर आहेत, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त