ठाणे

Thane : सहकार विद्यालयातील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्व विद्यार्थी कळवा रुग्णालयात दाखल

पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार

Swapnil S

ठाणे : कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे.

शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात मुखत्वे करून खिचडी दिली जाते. कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता. मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या. ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला याची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने ३८ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध मळगावकर यांनी दिली आहे. दरम्यान मुलांना देण्यात आलेली आमटीमधून मटकीचा वास येत असल्याने या संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झाले आहेत.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना भेटू न दिल्याने पालक संतप्त झाले होते. वॉर्डच्या बाहेरच सर्व पालकांना थांबवण्यात आल्याने पालक वॉर्डमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पालकांमध्ये खटके उडाले. आम्हाला संध्याकाळी ५ च्या दरम्यान सहकार विद्यालयातून फोन आला की शाळेतील मुलांना उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत आहे. त्यानंतर आम्ही रुग्णवाहिका पावठवून मुलांना कळवा रुग्णालयात आणून त्यांच्यावर १० मिनिटांत उपचार सुरू केले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांना २४ तास निगरानीखाली ठेवण्यात येणार आहे, असे - डॉ. अनिरुद्ध मळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, कळवा रुग्णालय यांनी सांगितले.

मी खिचडी खाल्ली नाही म्हणून मी वाचले, ज्यांनी खिचडी खाल्ली त्यांना पोटदुखी सुरू झाली, उलट्या सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी सर्वांना रुग्णालयात आणले. - तनिष्का फासे, विद्यार्थिनी

मी कामावर होतो, माझ्या मुलीने दुसऱ्याच्या फोनवरून मला कळवले. ही शाळेची जबाबदारी होती. आधी शाळेने अन्न तपासायला हवे होते. शाळेत टिफिन आणू नका असे शाळेतून सांगितले असल्याने आम्ही मुलांना टिफिन देत नाही म्हणून त्यांना शाळेतून आहार घ्यावा लागतो. - मंगेश कांबळे, पालक

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?