Thane : हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम! ६८ ठिकाणी कारणे दाखवा नोटीस, ३ लाख ५० हजारांचा दंड संग्रहित छायाचित्र
ठाणे

Thane : हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम! ६८ ठिकाणी कारणे दाखवा नोटीस, ३ लाख ५० हजारांचा दंड

ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने बांधकामस्थळांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे.

Swapnil S

ठाणे : शहरातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने बांधकामस्थळांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत शहरातील ८० बांधकामस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नियमांचे पालन न करणाऱ्या ६८ बांधकामस्थळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, संबंधित बांधकामस्थळांवर एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिका क्रमांक ३/२०२३ च्या अनुषंगाने गठित उच्चस्तरीय समितीच्या (एचपीसी) बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंडळाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्राद्वारे एकूण २९ मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

या मोहिमेदरम्यान प्रदूषण नियंत्रण विभागाच्या प्रतिनिधींनी शहरातील विविध बांधकामस्थळांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची तपासणी केली. बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ आणि इतर प्रदूषक घटक हवेत पसरू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे की नाही, याची पाहणी करण्यात आली. धूळ नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या व्यवस्था तसेच संबंधित नियमांचे पालन होत आहे की नाही, याचीही तपासणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही तपासणी व कारवाईची मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
विद्या सावंत, मुख्य पर्यावरण अधिकारी, महापालिका

सहा प्रभागांमध्ये तपासणीवर भर

महापालिकेच्या या मोहिमेत नौपाडा-कोपरी, उथळसर, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वर्तकनगर या प्रभागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. नौपाडा-कोपरी आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५८ बांधकामस्थळांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ५२ ठिकाणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात तीन बांधकामस्थळांची तपासणी करून दोन ठिकाणी, तर कळवा प्रभाग समिती क्षेत्रात सात बांधकामस्थळांची पाहणी करून सर्व सात ठिकाणी नोटीस बजावण्यात आली. माजिवडा-मानपाडा आणि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात १२ बांधकामस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात ठिकाणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या दोन्ही प्रभागांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप