Thane : गॅलरी कोसळून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू 
ठाणे

Thane : गॅलरी कोसळून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

ब्रह्मांड परिसरातील आझादनगर येथील मद्रास चाळीत शुक्रवारी दुपारी घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली.

Swapnil S

ठाणे : ब्रह्मांड परिसरातील आझादनगर येथील मद्रास चाळीत शुक्रवारी दुपारी घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १२ वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा मृत्यू झाला, तर त्याची आई उर्मिला जयस्वाल (३५) आणि भाऊ विनित जयस्वाल (९) जखमी झाले आहेत.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कापूरबावडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मिशनरी चॅपल चर्चलगत असलेल्या सुमारे २५ ते ३० वर्षे जुन्या तळ अधिक एक मजली मद्रास चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळून शेजारील घरावर पडला. त्यावेळी घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले.

उर्मिला आणि विनित जयस्वाल यांच्यावर मानपाडा येथील टायटन रुग्णालयात उपचार सुरू असून जयकुमारला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आरोपीचा हैवानपणा! POCSO गुन्ह्यात जामीनावर बाहेर येताच पत्नी, दोन मुलांसह सहा जणांची निर्घृण हत्या

Mumbai 7/11 Blasts : ११ मिनिटांत सात स्फोटांनी हादरली होती मुंबई; हल्ल्याला २० वर्षे, मृतांना पश्चिम रेल्वेकडून श्रद्धांजली

Mumbai : आरबीआयचे नवे मध्यवर्ती कार्यालय नरिमन पॉइंटला; १५८६ कोटी रुपये खर्च

काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन; राम मंदिरातील गैरव्यवहारावर भाजपचे मौन का?

उल्हास नदीवरील नवा पूलच ठरला ‘पूरग्रस्त’; पुलाच्या उभारणीच्या नियोजनावर नागरिकांचा सवाल