ठाणे

भाजप-शिंदे सेनेतील मतभेद पुन्हा उघड; ठाण्यातील उद्यानाच्या उद्घाटनावरून राजकारण तापले

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील मतभेद पुन्हा उघडकीस आले आहेत. सोमवारी पोखरण क्रमांक दोन येथील हिरानंदानी मेडोज परिसरातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन उद्यानाच्या उद्घाटनावरून दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचे राजकारण रंगल्याचे दिसून आले.

Swapnil S

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील मतभेद पुन्हा उघडकीस आले आहेत. सोमवारी पोखरण क्रमांक दोन येथील हिरानंदानी मेडोज परिसरातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन उद्यानाच्या उद्घाटनावरून दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचे राजकारण रंगल्याचे दिसून आले. राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यावरून यापूर्वी राजकारण रंगलेले असताना, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जिजाऊंचे तैलचित्र मांडत या उद्यानाचे उद्घाटन उरकून घेतले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या रितसर निमंत्रणानुसार उद्यानाचे लोकार्पण केले.

उद्यानाच्या नूतनीकरणानंतर राजमाता जिजाऊंचा पुतळा काढण्यात आल्यामुळे आधीच स्थानिक स्तरावर नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी रमेश आंब्रे यांनी प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत, आमदार निरंजन डावखरे यांच्या स्वखचार्तून आणलेले जिजाऊंचे तैलचित्र उद्यानात बसवून स्वत:च उद्घाटन सोहळा उरकून घेतला. काही तासांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेच्या अधिकृत कार्यक्रमात पुन्हा एकदा उद्घाटन करण्यात आले. या दुहेरी उद्घाटनामुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपकडून प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला, तर शिंदे सेनेने अधिकृत उद्घाटन रितसर पालिकेच्या नियमानुसार झाल्याचे स्पष्टीकरण दिले.

हिरानंदानी मेडोज परिसरात साडेतीन एकर क्षेत्रावर विकसित केलेले हे राजमाता जिजाऊ प्राणवायू उद्यान ठाणेकरांसाठी हिरवाई आणि विरंगुळ्याचे नवे ठिकाण ठरणार आहे.

उद्यानाच्या निमंत्रणपत्रिकेत गोंधळ

उद्यानाच्या निमंत्रणपत्रिकेत गोंधळ झाला. राजमाता जिजाऊंच्या छायाचित्राऐवजी अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्र छापले गेल्याने भाजपकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावरून प्रशासनाने झालेली चूक मान्य करत दुरुस्ती केली असल्याचे कळते.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

दोस्त दोस्त ना राहा...

प्रदूषण रोखण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्नांची गरज

आजचे राशिभविष्य, २२ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला