ठाण्यात काँग्रेसचा ‘दोरखंड’ एल्गार; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन 
ठाणे

ठाण्यात काँग्रेसचा ‘दोरखंड’ एल्गार; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन

पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी अनोखे ‘दोरखंड आंदोलन’ करत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला.

Swapnil S

ठाणे : पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी अनोखे ‘दोरखंड आंदोलन’ करत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. महागाईच्या जोखडात जनता अडकली असल्याचा संदेश देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील तीन पेट्रोल पंपांवरून वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण तापले होते. या आंदोलनाचे नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. त्यांनी स्वतः शरीराला दोरखंड बांधून वाहन ओढत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध नोंदवला. इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोखा, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. वाढत्या इंधन दरांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने इंधनावरील करवाढ तातडीने कमी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील सामान्य माणूस महागाईच्या खाईत ढकलला गेला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून जनतेची लूट सुरू आहे. बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटामुळे जनता त्रस्त असताना सरकार केवळ जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; अन्यथा काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन उभे करेल.
राहुल पिंगळे, अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय