ठाणे

ठाणे जिल्ह्यात ‘मच्छरला टक्कर’ अभियान; कीटकजन्य आजारांविरोधात जनजागृती

चित्ररथ ठाणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत फिरवून नागरिकांना मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांबाबत जागरूक केले जाणार आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे जिल्हा आरोग्य विभागामार्फत कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी ‘मच्छरला टक्कर’ या विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ठाणे आणि Godrej Embed- FHI संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलीस आयुक्तालयाच्या मैदानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर, सहाय्यक संचालक डॉ. मनीष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी जनजागृती चित्ररथ मोहिमेची सुरुवात केली.

भव्य चित्ररथ मोहीम

या उपक्रमांतर्गत चार जनजागृतीपर चित्ररथांचे उद्घाटन करण्यात आले. हे चित्ररथ ठाणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत फिरवून नागरिकांना मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांबाबत जागरूक केले जाणार आहे. गतवर्षी ठाणे जिल्ह्यात हिवतापाचे २,०७३ रुग्ण, डेंग्यूचे १,०९३ रुग्ण, चिकुनगुनियाचे १६८ रुग्ण आढळून आले होते. वाढत्या शहरीकरणामुळे आणि साचलेल्या पाण्याच्या समस्येमुळे हे आजार सार्वजनिक आरोग्यासमोर मोठे आव्हान ठरत असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले.

हत्तीरोग प्रतिबंधक औषधांचे वाटप

चित्ररथांद्वारे नागरिकांना घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, डास प्रतिबंधक उपायांचा वापर, ताप आल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी, हत्तीरोग दुरीकरणासाठी विशेष मोहीम या बाबींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. याच कार्यक्रमात १० ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भिवंडी तालुक्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संतोषी शिंदे यांनी दिली. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन हत्तीरोग प्रतिबंधक औषधे देणार आहेत.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये