Photo : X (@ceozpthane)
ठाणे

ठाणे जिल्ह्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रम; ३ हजार ६५९ अर्जदारांना घरपोच शासकीय सेवा

ठाणे जिल्हा परिषदेच्या डोअर स्टेप डिलिव्हरी उपक्रमांतर्गत ३ हजार ६५९ अर्जदारांना घरबसल्या शासकीय सेवा पुरविण्यात आल्या आहेत. ८० विभागांच्या ४०२ सेवांचा लाभ जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळतो आहे.

Swapnil S

ठाणे : सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारातच सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या डोअर स्टेप डिलिव्हरी उपक्रमांतर्गत ३ हजार ६५९ अर्जदारांना घरबसल्या शासकीय सेवा पुरविण्यात आल्या आहेत. ८० विभागांच्या ४०२ सेवांचा लाभ जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळतो आहे.

हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात असून, आतापर्यंत एकूण ४ हजार १३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ६५९ अर्ज पूर्ण झाले असून, उर्वरित १७० अर्जांवर काम सुरू असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.

प्रमुख सेवा व विभाग

लोकहक्क सेवा आयोगांतर्गत दाखले : मृत्यू व जन्मदाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना क्रमांक ८ (मालमत्ता फेरफार), निराधार योजनेसाठी वयाचा दाखला इत्यादी.

विविध प्रमाणपत्रे : जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उद्योग आधार, जीवन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, पॅनकार्ड व दुरुस्ती, पासपोर्टसाठी शपथपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शेत मोजणी अर्ज, चारित्र्य पडताळणी.

इतर सुविधा : तिकीट आरक्षण, शाळा व परदेशी शिष्यवृत्ती, शासकीय वसतिगृह प्रवेश, अर्थसहाय्य, नवीन कौटुंबिक शिधापत्रिका, महाभरती व नोकरी नोंदणी. महसूल, पोलीस व जिल्हा कार्यालयाशी संबंधित सेवाही या उपक्रमांतर्गत घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क