ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी 
ठाणे

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी

ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू झाल्याने प्राणीप्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. बाळकुम अग्निशमन केंद्रामागील माजिवडा गाव परिसरात या अत्याधुनिक गॅसदाहिनीचे लोकार्पण शनिवारी सकाळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू झाल्याने प्राणीप्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. बाळकुम अग्निशमन केंद्रामागील माजिवडा गाव परिसरात या अत्याधुनिक गॅसदाहिनीचे लोकार्पण शनिवारी सकाळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी असावी, अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती.

त्यानुसार माजिवडा गावातील स्मशानभूमी शेजारी स्वतंत्र प्राणीस्मशानभूमी उभारण्यात आली आहे. या स्मशानभूमीचा प्रवेशद्वार वेगळा असून प्राणीप्रेमींची वर्षानुवर्षांची मागणी आज पूर्ण झाली आहे.

कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता संजय कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता धायगुडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर, बी. व्ही. अभियंता गव्हाणे व प्राणी मित्र संघटनेच्या सोनाली सजननी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉग शेल्टर आणि पेट गार्डनचीही योजना

भटक्या कुत्र्यांची समस्या लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर घोडबंदर रोड परिसरात मोठे डॉग शेल्टर उभारण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभराव यांना केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू आहे. तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात पेट गार्डन विकसित करण्याचाही त्यांचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्मशानभूमींसाठी ५० कोटींचा निधी

ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील स्मशानभूमींचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येत असून राज्य सरकारकडून महापालिकेला 'मुलभूत सोयीसुविधा विकास' योजनेअंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून येऊर गाव, रामबाग-उपवन, माजिवडा गाव, वाघबीळ, मोघरपाडा येथील स्मशानभूमींच्या उभारणी व नूतनीकरणाची कामे सुरू आहेत.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

कर्जतमध्ये क्रूरतेचा कळस! शेजारणीने केली अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या, धक्कादायक कारण समोर

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत