Thane : गणरायाच्या स्वागतासाठी ठाणे जिल्हा सज्ज; १ लाख ८२ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जनासाठी १९३ ठिकाणी व्यवस्था 
ठाणे

Thane : गणरायाच्या स्वागतासाठी ठाणे जिल्हा सज्ज; १ लाख ८२ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जनासाठी १९३ ठिकाणी व्यवस्था

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा सुमारे १ लाख ८२ हजार ६५० गणेश व गौरी मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा सुमारे १ लाख ८२ हजार ६५० गणेश व गौरी मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या १ हजार ७६ मूर्ती, घरगुती गणेशमूर्तीची १ लाख ६६ हजार २३१, तर गौरींच्या सुमारे १५ हजार ३४३ मूर्तीचा समावेश आहे.

परिमंडळनिहाय आकडेवारी पाहता, परिमंडळ-३ मध्ये सर्वाधिक ६० हजार ६६ मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ परिमंडळ-४ मध्ये ५४ हजार २०९, परिमंडळ ५ मध्ये ३४ हजार २२७, परिमंडळ-१ मध्ये १७ हजार २८४, तर परिमंडळ-२ मध्ये १६ हजार ८६४ मूर्तीची प्रतिष्ठापना अपेक्षित आहे.

१९३ गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठीही प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळांत मिळून विसर्जनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ६६ संकलन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच मोठ्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी १२ प्रमुख विसर्जन घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या सुविधांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने प्रमुख विसर्जन घाटांवरील गर्दीचा ताण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. उपलब्ध आकडेवारीवरून यंदाच्या गणेशोत्सवात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरगुती गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रमुख विसर्जन घाट

मोठ्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी खारेगाव-पारसिक रेल्वे क्रॉसिंग विसर्जन घाट, मासुंदा तलाव, नदी घाट, राऊतवाडी घाट, कळवा खाडी, मुंब्रा घाट, मुंब्रा देवी घाट, कोपरी खाडी, उल्हास नदी, मोहेना घाट, उपवन तलाव आणि कोलशेत खाडी आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. परिमंडळ-१ मध्ये ३८ विसर्जनस्थळे व ९ संकलन केंद्रे, परिमंडळ-२ मध्ये ३९ विसर्जनस्थळे व १० संकलन केंद्रे, परिमंडळ-३ मध्ये ५६ विसर्जनस्थळे व २६ संकलन केंद्रे, परिमंडळ-४ मध्ये ४३ विसर्जनस्थळे व १२ संकलन केंद्रे, तर परिमंडळ-५ मध्ये १७ विसर्जनस्थळे व १३ संकलन केंद्रे उपलब्ध असणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Sindhudurg : महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तावेजीकरण; 'Bappa.org' मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन

भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

रशियाची भारतातून विक्रमी इंधन आयात; युक्रेनच्या हल्ल्यांमुळे देशांतर्गत शुद्धीकरण क्षमता बाधित

Thane : पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यत्यय; शहरातील काही भागांत पाणी साचले, वाहतुकीवरही परिणाम

Mumbai : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव यंदा साधेपणाने; नुकसानग्रस्त मूर्तीची लोखंडी संरचना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत