ठाणे

Thane : जिल्ह्यात ‘हर घर जल’ योजनेस ‘घर घर’; निधीअभावी जलजीवन मिशनचे तीनतेरा

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून 'हर घर जल' योजना राबविण्यात येत आहे.

Swapnil S

- ठाणे दर्पण

- अतुल जाधव

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून 'हर घर जल' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहे. परंतु या योजनेसाठी दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने निधीअभावी जिल्ह्यात या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.

यंदा मार्च महिन्यापासूनच ऊनाच्या झळा लागू लागल्या आहेत. उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्र होत असताना पाण्यापेक्षा फक्त विविध शासकीय योजनांचा महापूरच अधिक वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मागील पंचवीस वर्षांचा आढावा घेतला तर जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी व्हावी म्हणून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र योजना पूर्ण करण्यासाठी लागत असणाऱ्या निधीचा दुष्काळ असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ दिवसोंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. जल स्वराज्य, राष्ट्रीयपेय जल, भारत निर्माण, हर घर जल, जल जीवन मिशन अशा अनेक योजना फक्त कागदापुरत्या उरल्या आहेत. प्रत्येक घरात शुद्ध गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी शासनाची बहुचर्चित घर जल योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षम यंत्रणामुळे ग्रामीण परिसरातील गावे, पाडे, विशेषत: आदिवासी पाडे तहानलेलेच आहेत.

धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. या तालुक्यात जल जीवन मिशन खाली सुरू असलेली कामे निधीअभावी थांबलेली आहेत तर दुसरीकडे पाटबंधारे खात्याच्या सहा धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. एकट्या शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायत हद्दीतील गाव, पाड्यात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून घरोघरी नळ पाणीपुरवठा यावा, यासाठी जलजीवन मिशन अभियान राबविण्यात सुरू करण्यात आले. स्वच्छ आणि शुद्ध मुबलक पाणीपुरवठा घरोघरी व्हावा, हा या योजनेमागचा मूळ उद्देश होता.

७२० योजनांपैकी १६९ योजना पूर्ण

ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २०१९ मध्ये जल जीवन मिशन अभियान सुरू करण्यात आले. त्या वेळेस ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २९ गावांमध्ये २ लाख ३४ हजार ६१२ कुटुंबे यांची नोंद करण्यात आली होती मात्र त्यापैकी ६६ हजार ७५ कुटुंबांना घरगुती नळजोडणी देण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या ७२० योजना घेण्यात आल्या असून त्यापैकी १६९ योजना पूर्ण झाल्या आहेत. कामांची मुदत संपली तरी या योजनेखाली कामे कासव गतीने सुरू आहेत. मागील वर्षभर ठेकेदारांना कामाची बिले मिळत नसल्याने करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीटंचाई, टँकरमुक्ती केवळ कागदावरच

प्रतिमाणसी किमान ५५ लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २०२४ पर्यंत या अभियानातील सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. पण ठेकेदारांची अकार्यक्षमता, तांत्रिक अडचणी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्थानिक राजकारण या कारणामुळे यामुळे या योजनेच्या मूळ उद्दिष्टालाच धक्का बसला आहे. अनेक योजनांवर आजपर्यंत करोडो रुपयांचा निधी खर्च करून देखील उन्हाळ्यात जिल्ह्याची पाणीटंचाई संपत नसून टँकरमुक्ती कधी होणार हा प्रश्न कायम आहे.

गुन्हेगारांचा माग काढणे सोयीचे होणार

राज्य शासनाची संकल्पना आणि लोकसहभाग यातून निर्माण होणाऱ्या सीसी कॅमेऱ्याचे जाळे यामुळे सुरक्षेचे एक कवच तयार होणार आहे. भौगोलिक क्षेत्र मोठे असलेल्या परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा कस लागतो. मात्र सदर परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आल्या नंतर सीसीटीव्ही कॅमेरे गावातील अंतर्गत हालचाली, गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडल्यास तपासासाठी गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी या सीसी कॅमेऱ्यांची मोठी

मदत होणार आहे. त्याचप्रमाणे तडीपार गुन्हेगाराचा फोटो टाकून त्याचा ठावठिकाणा काढणे शक्य होणार आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार