ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर

ठाणे महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रांमधील कामकाजावर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रांमधील कामकाजावर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या, त्यांना मिळणारे उपचार, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा साठा, बालकांचे लसीकरण यासह दैनंदिन कामकाजाची माहिती आता रोजच्या रोज प्रशासनाला द्यावी लागणार आहे. महिनाअखेरीस अहवाल देण्याच्या पद्धतीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.

ठाणे महापालिका मुख्यालयात आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक आरोग्य केंद्रात दिवसभरात किती रुग्ण आले, त्यापैकी कोणत्या आजारांचे रुग्ण होते, किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, त्यांना वेळेत उपचार मिळाले का, औषधांचा पुरेसा साठा आहे का, बालकांना कोणकोणत्या लसी देण्यात आल्या, यासह अन्य महत्त्वाची माहिती त्याच दिवशी सायंकाळपर्यंत प्रशासनाला उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या दैनंदिन कामकाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट लक्ष राहणार आहे.

वर्षानुवर्षे एकाच केंद्रात ठाण मांडणाऱ्यांना धक्का

महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे रोटेशन करण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. डॉक्टरांची सहा महिन्यांच्या कालावधीनंतर बदली करण्याची प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

४-जी स्मार्टफोनची बाजारपेठ वाढणार; ५-जी महागल्याने बजेट श्रेणीत ४जी मोबाईल्सना मागणी

दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्रात पथक पाठवणार; केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

आम्ही कुणाही पक्षात सहभागी होणार नाही; शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा