ठाण्यात व्यावसायिक गॅस पुरवठयावर संक्रांत; हॉटेल व्यावसायिक हवालदिल 
ठाणे

ठाण्यात व्यावसायिक गॅस पुरवठयावर संक्रांत; हॉटेल व्यावसायिक हवालदिल

पश्चिम आशियातील संघर्षाच्या फटका सामान्य जनतेला हळूहळू बसताना दिसत आहे. राज्यातील इतर शहरांप्रमाणे ठाणे शहरात एलपीजी गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. विशेषत: व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.

Swapnil S

ठाणे : पश्चिम आशियातील संघर्षाच्या फटका सामान्य जनतेला हळूहळू बसताना दिसत आहे. राज्यातील इतर शहरांप्रमाणे ठाणे शहरात एलपीजी गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. विशेषत: व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने हॉटेल आणि खाद्यव्यावसायिकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम देशातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर होत असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे शिधावाटप विभागाने स्पष्ट केले आहे. तरीही घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी गॅस वितरणासाठी विशेष प्राधान्यक्रम लागू करण्यात आला आहे. ज्या ग्राहकांकडे केवळ एकच सिलिंडर आहे, त्यांना प्रथम गॅस उपलब्ध करून देण्याच्या सूचना एजन्सींना देण्यात आल्या आहेत. तर दोन सिलेंडर असलेल्या ग्राहकांसाठी २५ दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, ठाण्यासह जिल्ह्यातील काही भागात हॉटेल, उपाहारगृहे आणि खाद्यव्यवसायिकांना वापरासाठी लागणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर गेल्या चार दिवसांपासून परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल चालकांना व्यवसाय चालविणे कठीण झाले असून काही ठिकाणी पर्यायी उपायांचा अवलंब करावा लागत आहे.

ठाणे जिल्ह्यातील गॅस पुरवठा व्यवस्थापनासाठी ४१ फ परिमंडळात ६ तर संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ७२ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. या एजन्सींना घरगुती गॅस वितरणासाठी प्राधान्यक्रमाचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील वापरलेले गॅस सिलेंडर रिफिलिंग करण्यासाठी उरण तालुक्यातील बेंडखळ तसेच मुंबईतील चेंबूर येथील माहूल या दोन ठिकाणी रिफिलिंग केंद्रे आहेत. या केंद्रांमधूनच ठाणे जिल्ह्यात गॅसचा पुरवठा केला जातो.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात

Mumbai : माटुंगा रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावी पुनर्वसन घरांचे भूमिपूजन

Mumbai : कारवाईआधी राज्य सरकारशी चर्चा करा! झोपड्यांबाबत खासदारांची विभागीय बैठक; रेल्वेला सूचना