ठाणे

रात्री मंदिरात थांबलेल्या विवाहितेची सामूहिक अत्याचार करून हत्या; तिघांना अटक

Swapnil S

ठाणे : मंदिरात रात्री थांबलेल्या ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिघा नराधमांना डायघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शामसुंदर प्यारचंद शर्मा (६२), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (४५), राजकुमार रामफेर पांडे (५४) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अटक आरोपी मंदिरात सेवेकरी म्हणून काम करतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या मागे एका अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत ९ जुलै रोजी आढळून आला होता. मयत महिलेच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेची माहिती घेतली, त्यात नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्यात बेलापूर गाव येथे राहणारी ३० वर्षीय विवाहिता मिसिंग असल्याचे समोर आले.

मयत महिलेची ओळख पटल्यानंतर डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन पथके बनवून आरोपींचा शोध सुरू केला. घटनास्थळी असलेले फुटेज पडताळून बघितले असता घोळ गणपती मंदिर व गौशाला परिसरात सेवेकरी असलेल्या दोघांवर पोलिसांना संशय आला. डायघर पोलिसांनी संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा आणि राजकुमार रामफेर पांडे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघे व त्यांचा साथीदार शामसुंदर प्यारचंद शर्मा या तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी मंदिरात थांबलेल्या विवाहितेला गुंगीचे पेय पाजून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर महिलेस शुद्ध आल्यावर आरडाओरडा केल्यामुळे तिला मंदिरामागील बाजूस खोल दरीत नेऊन तिची हत्या केली अशी माहिती डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली. पोलिसांनी तिसरा आरोपी शर्मा यास मुंबईतून अटक केली आहे. घरगुती वाद झाल्याने रागाच्या भरात ही महिला घरातून निघून गेली होती अशी प्राथमिक माहिती आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था