ठाणे

ठाणे : मासुंदा तलावाजवळ खवय्यांची चंगळ होणार; फूड हब उभारणार, फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू

Swapnil S

ठाणे : मासुंदा तलाव किंवा तलावपाळी ठाणे शहराची विशेष ओळख आहे. ठाणे शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावाला नेहमीच फेरीवाल्यांचा वेढा पडत असल्याने मासुंदा तलावाला बकालपणा येतो. मासुंदा तलावाला लागलेले फेरीवाल्यांचे ग्रहण अखेर सुटणार असून जवळील गांधी उद्यानालगत फूड हब उभारून फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली 'ठामपा'ने सुरू केल्या आहेत.

ठाणे शहराची चौपाटी, मनोरंजनाचे हक्काचे स्थळ म्हणून मासुंदा तलावाकडे पाहिले जाते. शहराबाहेरील नागरीकही येथे पर्यटनासाठी येतात. म्हणूनच गेल्या वर्षी मासुंदा तलावाचा कायापालट करत परिसर आणखी सुशोभित करण्यात आला आहे. मात्र सुशोभनानंतरही फेरीवाल्यांमुळे तलावाला बकालपणा आला होता. त्याच दरम्यान पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पाहणी दौऱ्यात ही बाब निदर्शनास आली. या फेरीवाल्यांना हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र पर्यटकांची गैरसोय लक्षात घेत फेरीवाल्यांसाठी खाऊ गल्ली तयार करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर आता जवळपास एक वर्षाने या आदेशाची कार्यवाही होत आहे. फूड हब तयार करण्याची जबाबदारी पालिका ठेकेदारावर सोपवणार आहे. त्यासाठी प्रशासनाने रितसर निविदा प्रसिद्ध केली असून त्यानेच मैदानाचा विकास करून फेरीवाल्यांसाठी फूड हब उभारायचे आहे.

परिसरातील खाद्य विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य

मासुंदा तलावाजवळ असलेल्या गांधी उद्यानाशेजारील मैदान विकसित करून तेथे फूड हब उभारण्यात येणार आहे. पाणी, विद्युत दिवे आणि इतर सुविधा या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत. या फूड हबमध्ये पाणीपुरी, पावभाजी, आइस्क्रीम असे विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत. तलावपाळी परिसरात वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना या हबमध्ये प्रथम प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर असलेली कारवाईची सततची टांगती तलवार दूर होणार आहे. पर्यटकांनाही विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटता येणार आहे.

Maharashtra HSC 12th Result 2024 Live Updates: यंदाही मुलींची बाजी तर मुंबई विभागाचा सर्वाधिक कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी

नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात