Thane : म्हाडाच्या धोकादायक इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; रहिवाशांची आक्रमक भूमिका, विकासकाला अटक  
ठाणे

Thane : म्हाडाच्या धोकादायक इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; रहिवाशांची आक्रमक भूमिका, विकासकाला अटक

गेली दहा वर्षे म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने सुमारे ४०० कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित होती. या प्रकरणी रहिवाशांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि आमदार संजय केळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विकासकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Swapnil S

ठाणे : गेली दहा वर्षे म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने सुमारे ४०० कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित होती. या प्रकरणी रहिवाशांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि आमदार संजय केळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विकासकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे संबंधित इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वसामान्य रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात केली होती. वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विकासकाला अटक झाल्याने या मागणीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

संबंधित विभागांच्या बैठका घेऊन विकासकाला काम सुरू करण्यासाठी वारंवार सूचना करण्यात आल्या. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अखेर रहिवाशांच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आमदार केळकर यांनी हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करत रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

ठाण्यात अनेक गृहबांधणी प्रकल्पांमध्ये विकासकांकडून रहिवाशांची फसवणूक होत असून काही प्रकरणांत गुन्हेही दाखल झाले आहेत. अशा सर्व प्रकरणांत मी रहिवाशांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पोलीस आणि राज्य शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून, त्यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
संजय केळकर, आमदार

विकासकांचा वेळकाढूपणा

ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील म्हाडाच्या इमारत क्रमांक ३, १०, ११, ४८, ४९ आणि ५० या इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. या इमारतींमध्ये राहणारी सुमारे ४०० कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत होती. पुनर्विकासासाठी म्हाडाने सुमारे दहा वर्षांपूर्वी भालेराव या विकासकाची नियुक्ती केली होती. विकासकाने जुन्या इमारती पाडल्यानंतर रहिवाशांना भाड्याच्या घरात स्थलांतरित व्हावे लागले. मात्र त्यानंतर तब्बल दहा वर्षे उलटूनही पुनर्विकासाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. विकासकाकडून वारंवार आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग