ठाणे

Thane : ...तर अवजड वाहने फोडू; वाहतूककोंडीमुळे मनसेचा इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रात्री बाराच्या आधी अवजड वाहनांची ये-जा होऊ नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र तरीही शहरातील काही भागांत अवजड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक रूप धारण करत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे.

Swapnil S

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रात्री बाराच्या आधी अवजड वाहनांची ये-जा होऊ नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र तरीही शहरातील काही भागांत अवजड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक रूप धारण करत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे.

जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मनापासून पाळू. जर रात्री बाराच्या आधी ठाणे शहरात अवजड वाहने फिरताना दिसली, तर ती वाहने आम्ही फोडून टाकू, वाहतुकीचे नियम पाळले गेले पाहिजेत, अन्यथा आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराच दिला आहे.

ठाण्यातील वाहतूककोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आला आहे.

मनसेच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर कठोर अंमलबजावणीसाठी दबाव वाढला आहे.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

उल्हासनगरच्या वाहतूककोंडीवर उतारा? उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र वेंगुर्ल्यात

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ लावल्यास १००० रु. दंड; थेट तुरूंगवासही, दक्षिण रेल्वेचा नवा नियम

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही