ठाणे

ठाणे : अन् त्याने माझ्या अंगावर गाडी घातली, प्रियाने रडत रडत सांगितली 'ती' भयानक घटना; बघा Video

Swapnil S

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ओवळा भागात एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून तिच्या अंगावर कार घालून चिरडत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अलीकडेच उघडकीस आली. प्रिया सिंग असं जखमी तरुणीचं नाव असून अश्वजीत गायकवाड असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. रुग्णालयात भरती असलेल्या प्रियाने घडलेला सर्व प्रकार कथन केला आहे.

अश्वजीत विवाहित होता आणि त्याने ही गोष्ट प्रियापासून लपवली होती. याबाबत समजल्यावर प्रियाने त्याला जाब विचारला असता पत्नीपासून विभक्त झाल्याची बतावणी त्याने केली होती. 11 डिसेंबर रोजी प्रियाने त्याला त्याच्या पत्नीसोबत बघितले. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी अश्वजीत आणि त्याचे तीन मित्र रोमिल, प्रसाद पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाला प्रथम मारहाण आणि शिवीगाळ केली. त्यानंतर कारने चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रिया सिंह ही मॉडेल, फिटनेस ट्रेनर, फॅशन प्रमोटर असून ती इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिचे १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. घोडबंदर येथील वाघबीळ भागात ती राहते. गेल्या रविवारी घोडबंदर रोडजवळ एका मित्राच्या संगीत फंक्शनमध्ये आल्याचे अश्वजितने प्रियाला सांगितले होते. सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास प्रिया तेथील हॉटेलजवळ पोहोचली. तिथे अश्वजीत त्याच्या पत्नीसोबत होता. प्रियाला अचानक बघून अश्वजीतला धक्का बसला. त्यानंतर सर्व घटना घडली, असे प्रियाने सांगितले.

प्रियाने घडलेली घटना सोशल मीडियावरही सांगितली असून न्याय देण्याची मागणी केली आहे. संपूर्ण शरीरावर जखमा आहेत, हातावर, पाठीवर आणि पोटात खोलवर जखमा आहेत, याचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या घटनेला इतके दिवस उलटूनही मुख्य आरोपी अश्वजीत गायकवाड आणि त्याचे मित्र मोकाट फिरत आहेत. त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. अश्वजीत गायकवाडची ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय जवळीक असल्याने आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या एमएसआरडीसी खात्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र असल्याने ठाणे पोलीस दबावाखाली कारवाई करत नाहीत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त