ठाणे

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे महापालिकेत ४३ व्या वर्धापन दिनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई विभागाने छापा टाकला. या कारवाईत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे महापालिकेतील अतिक्रमण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Swapnil S

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे महापालिकेत ४३ व्या वर्धापन दिनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई विभागाने छापा टाकला. या कारवाईत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना २५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे महापालिकेतील अतिक्रमण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पाटोळे यांनी लाच मागितली होती. संबंधित व्यावसायिकाने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर एसीबीच्या विशेष पथकाने सापळा रचून पाटोळे यांना लाच घेत असताना अटक केली. अटक दरम्यान लाच रक्कमेसह काही महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर न्यायालयीन आदेशानुसार मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. अशा परिस्थितीत अतिक्रमण विभागप्रमुखाचाच लाचलुचपत प्रकरणात अडकणे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी महापालिकेचा ४३ वा वर्धापन दिन साजरा होतो, त्याच दिवशी ही कारवाई झाली. त्यामुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून, शहरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाकरे-शिंदे शिवसेनेचे आज दसरा मेळावे