ठाणे

ठाणे पालिकेची करवसुलीसाठी विशेष मोहीम; महापालिकेस सहकार्य करण्याचे आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, या टप्प्यामध्ये मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे होण्यासाठी करवसुलीची सर्वंकष विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी तात्काळ कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

Swapnil S

ठाणे : आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, या टप्प्यामध्ये मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे होण्यासाठी करवसुलीची सर्वंकष विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी तात्काळ कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून महापालिकेस सहकार्य केले आहे, त्याबद्दल आयुक्त राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत.

दि.०१ एप्रिल, २०२४ ते ३० सप्टेंबर, २०२४ या कालावधीचे प्रथम सहामाहीचे व दि.०१ ऑक्टोबर, २०२५ ते ३१ मार्च, २०२५ या कालावधीचे द्वितीय सहामाहीचे असे दोन सहामाहींचे एकत्रित वार्षिक मालमत्ता कराचे देयक देण्याची तरतूद आहे व यानुसार देयके देण्यात आली आहेत.

कर भरण्याची व्यवस्था

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही प्रभाग कार्यालयाकडील कर संकलन केंद्रामध्ये सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते सायं.०५.०० या कालावधीत धनादेश / धनाकर्ष (चेक / डी. डी.) डेबिट कम एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच रोख कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वाणे महानगरपालिकेच्या https://propertytaxthanecity.gov.in या लिंकद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, Google Pay. Phone Pe, PayTm BHIM App च्या माध्यमातून देखील कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अशी होईल कारवाई

या वसुली मोहिमेंतर्गत अद्याप ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही, अशा करदात्यांच्या मिळकतीवर वसुलीच्या कारवाई अंतर्गत संबंधितांस जप्तीसाठी वॉरंट बजाविणे, मिळकतीचे मूल्यांकन करून जाहीर लिलावाद्वारे मिळकतीची विक्री करणे अशा स्वरूपाच्या कारवाई हाती घेण्यात येत आहे. मालमत्ता कर वसुली अंतर्गत करदात्यांनी देय मालमत्ता कर महापालिकेकडे प्राधान्याने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शास्ती किंवा व्याज आकारणी

ज्या करदात्यांनी पहिल्या सहामाहीचा कर दि. ३१ जुलैपर्यत भरलेला नाही, अशा करदात्यांना दि. ०१ ऑगस्ट, २०२४ पासून शास्ती किंवा व्याज आकारण्यास सुरू झाली आहे. परिणामी, कर भरण्याच्या रकमेत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या सहामाहीचा कर दि.०१ ऑक्टोबर, २०२४ रोजी देय झाला असूर, दि. ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत न भरल्यास दि.०१ जानेवारीपासून शास्ती/व्याज आकारण्याची तरतूद असून, त्याप्रमाणे शास्ती किंवा व्याज आकारले जाणार आहे.

आजचे राशिभविष्य, १९ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती