Thane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस अधिकाऱ्याचे निधन 
ठाणे

Thane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस अधिकाऱ्याचे निधन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय शंकर सांगडे (५७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Swapnil S

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय शंकर सांगडे (५७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते कल्याण नियंत्रण कक्षात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात जबाबदारी पार पाडत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगडे हे ठाण्यातील कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि त्यांना चक्कर आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सांगडे हे मूळचे जुन्नरचे रहिवासी होते. ठाणे सिव्हिल रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरणात त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. ठाणे पोलिसांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन