ठाणे, रायगडमध्ये पावसाने दाणादाण! १ ठार, १ बेपत्ता; ११० झाडे कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला (Photo-X/@vani_mehrotra)
ठाणे

ठाणे, रायगडमध्ये पावसाने दाणादाण! १ ठार, १ बेपत्ता; ११० झाडे कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये मुसळधार पावसाचा जोर सोमवारीही कायम राहिला.

Swapnil S

भिवंडी : मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये मुसळधार पावसाचा जोर सोमवारीही कायम राहिला. त्यामुळे भिवंडी शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरले. अनेक दुकाने, घरांमध्येही पाणी शिरले होते. तसेच काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने ग्रामीणमधील अनेक गावांना शहराशी जोडणाऱ्या मुख्य भिवंडी पारोळ रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले.

ग्रामीणमधील चाकरमानी, नोकरदार वर्गाने कामावर जाण्यासाठी सकाळी शहराचा रस्ता धरला. परंतु शहराला जोडण्यासाठीच्या भिवंडी पारोळ या मुख्य रस्त्यावरील कांबे-तळवली गावच्या हद्दीत कमरेपर्यंत पाणी साचल्याने अनेकांना आल्या पायी घरची वाट धरावी लागली.

भिवंडी तालुक्यातील कांबे, जुनांदुरखी, टेंभवली, चिंबिपाडा, लाखिवली, पालिवली, माजिवडा, गडकपाडा, खडकी, कुहे, नांदे अशा अनेक गाव पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला होता. 'कोसळधारे' ने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून सायंकाळ पर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसत होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी , Video

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके