संग्रहित छायाचित्र 
ठाणे

ठाण्यातील रेल्वे स्वच्छतागृह कंत्राटदाराकडून पैसे वसुली; दररोज हजारो प्रवाशांची फसवणूक

ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहातील कंत्राटदाराकडून दररोज हजारो प्रवाशांकडून मुतारीसाठी एक ते दोन रुपयांची आकारणी करून प्रवाशांची फसवणूक केली जात आहे.

Swapnil S

प्रतिनिधी/ठाणे

ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहातील कंत्राटदाराकडून दररोज हजारो प्रवाशांकडून मुतारीसाठी एक ते दोन रुपयांची आकारणी करून प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. मोफत असलेल्या सुविधा न देता कंत्राटदाराकडून हजारो रुपयांची वसूली केली जात आहे. या प्रकाराविरोधात भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असून, स्वच्छतागृहाबाहेर मुतारी मोफत असल्याची पत्रके लावली आहेत.

ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये दररोज सुमारे साडेसहा लाखांहून अधिक प्रवाशांची वर्दळ आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. तर काही स्वच्छतागृहे पे ॲण्ड यूज तत्त्वावर आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये मुतारीचा वापर मोफत आहे. परंतु, स्वच्छतागृहांच्या बहुसंख्य कंत्राटदारांकडून प्रत्येक प्रवाशाकडून एक ते दोन रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांबाहेर रेल्वेची स्वच्छतागृहाची नियमावली असलेली पत्रके लावली. तसेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांकडून मुतारीसाठी पैसे न घेण्याचा इशारा दिला. या संदर्भात ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडेही तक्रार करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव