ठाण्यात निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीला विरोध 
ठाणे

ठाण्यात निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणीला विरोध

सुमारे १५० निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले असून, आपत्कालीन सेवा वगळता रुग्णालयातील नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

Swapnil S

ठाणे : बीएचएमएस डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी (मार्ड) बुधवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सुमारे १५० निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले असून, आपत्कालीन सेवा वगळता रुग्णालयातील नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे निकष आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या संरक्षणासाठी आहे. प्रत्येक वैद्यकीय शाखेतील डॉक्टरांनी त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाच्या कार्यक्षेत्रातच सेवा द्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. विविध उपचारपद्धतींचे मिश्र स्वरूपातील उपचार रुग्णांच्या हितासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने पुढील २४ तासांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आपत्कालीन विभाग, अतिदक्षता विभाग (आयसीयू) तसेच इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड), एएसएमआय तसेच विविध तज्ज्ञ वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, शासनाने संबंधित प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांवर परिणाम होऊ नये,यासाठी रुग्णालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षक आणि इंटर्न डॉक्टरांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

Mumbai-Goa Highway : गणपतीत यंदाही वाहतूक कोंडीचे 'विघ्न'! माणगाव बाह्यवळण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

एलपीजी सिलिंडर होणार महाग?

ज्यांची पत्रकार परिषद, त्यांनीच संवाद साधायला हवा! सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

गडकरींशी संबंधित डीपफेक व्हिडिओ हटवा; उच्च न्यायालयाचे सोशल मिडीया कंपन्यांना आदेश

कर्जमुक्तीसाठी राज्यातील १.४० लाख शेतकरी अपात्र; १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा