'एआय'ने बनविलेली प्रतिमा 
ठाणे

बदलत्या हवामानामुळे ठाणेकर सर्दी, खोकल्याने बेजार; खासगी दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

दोन दिवस सतत पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात लक्षणीय बदल झाला असून बदलत्या हवामानामुळे ठाणेकर खोकला आणि सर्दीने बेजार झाले आहेत.

Swapnil S

ठाणे : दोन दिवस सतत पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात लक्षणीय बदल झाला असून बदलत्या हवामानामुळे ठाणेकर खोकला आणि सर्दीने बेजार झाले आहेत.

काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलाचा, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह खाजगी दवाखान्यांमध्ये थंडी तापासह, सर्दी, खोकलाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात खोकला आजार हा औषध उपचार करून देखील लवकर बरा होत नसल्यामुळे रुग्ण या आजारांनी बेजार झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेले बदल, कधी थंडी तर, कधी कडक उन्ह तर, कधी पाऊस याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. सर्दी, खोकला आणि अंगदुखीने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत आहे. अनेकजण यावर घरच्या घरी उपचार घेत आहेत. तर, काहीजण घराजवळील दवाखान्यात किंवा शासकीय आरोग्य केंद्रांवर उपचारासाठी गर्दी करत आहेत. यामध्ये बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला आणि अंगदुखीने त्रासलेले आहेत. तर, दुसरीकडे अवकळी पाऊस, उन्ह, वाटवरणात याचं निर्माण होणार गारवा यांमुळे उद्भवणाऱ्य साथरोगांचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

तसेच मलेरिया या आजारचे मागील वर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जानेवारी २०२४ आणि मे २०२४ या चार महिन्याच्या कालावधीत ५२ हजार १२७ रक्ताचे नमुणे गोळा केले होते. त्यात ६५ जणांना मलेरियाची लागण झाली होती. तर, यंदा याच काळात ८२ हजार ६३३ रक्ताचे नमुणे गोळा केले असून त्यापैकी ८९ जणांना लागण झाली होती.

दरम्यान, ठाणे पलिका क्षेत्रात जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या कालावधीत टायफाईडचे, हगवणचे, डायरेयाचे, स्वाईन फ्लुचे, लेप्टोचे, क्वॉलर आणि स्वाईन फ्लुचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारी वरुण समोर आली आहे. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रात सर्दी, खोकला आणि अंगदुखीने ताप झाला असला तरी, दुसरीकडे मात्र, साथरोग आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

२७ जणांना डेंग्युची लागण

मागील वर्षी खासगी व शासकीय रुग्णालयात जानेवारी २०२४ आणि एप्रिल २०२४ याकालावधीत डेंग्युचे ४९ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ३१ जणांना डेंग्युची लागण झाली होती. तर, यंदाच्या वर्षी याच काळात ८३ संस्थायित आढळून आले असून त्यापैकी २७ जणांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार