Thane : रिक्षा बंदवरून संघटनांमध्येच जुंपली; एकाचा बेमुदत बंदचा इशारा, दुसऱ्याचा मात्र संपाला विरोध 
ठाणे

Thane : रिक्षा बंदवरून संघटनांमध्येच जुंपली; एकाचा बेमुदत बंदचा इशारा, दुसऱ्याचा मात्र संपाला विरोध

सीएनजी दरवाढीने रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनावरून ठाण्यातील रिक्षा संघटनांमध्येच मतभेद उफाळले आहेत. ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीने १ डिसेंबर रोजी शहरातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Swapnil S

ठाणे : सीएनजी दरवाढीने रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले असताना प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनावरून ठाण्यातील रिक्षा संघटनांमध्येच मतभेद उफाळले आहेत. ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीने १ डिसेंबर रोजी शहरातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. तर शिवसेनाप्रणीत रिक्षा-टॅक्सी चालक-मालक सेनेने संपाचा मार्ग न स्वीकारता सरकारशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली आहे.

गेल्या ११ महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो सुमारे ११ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, १ सप्टेंबर २०२६ रोजी रिक्षा-टॅक्सीच्या मीटर भाड्यात एक रुपयाची वाढ केली. इंधन दरवाढीच्या तुलनेत ही वाढ अत्यंत अपुरी असल्याने चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे संयुक्त कृती समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर समितीचे सल्लागार जितेंद्रकुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद पुकारण्यात आला आहे.

सीएनजीवर अनुदान किंवा इंधनावरील कर कमी करणे, रिक्षाचे पहिले दीड किलोमीटरचे भाडे ३० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये करणे, बेकायदा बाईक टॅक्सी आणि ई-रिक्षांवर कारवाई करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना त्रास दिल्यास कारवाई

रिक्षाचालकांच्या मागण्यांचा विचार करताना प्रवाशांच्या हिताकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. प्रवाशांना भाडे नाकारणे, मीटरपेक्षा जास्त भाड्याची मागणी करणे किंवा त्यांच्याशी अरेरावी आणि गुंडगिरी करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.

संप टाळण्यासाठी सरकारच्या हालचाली

रिक्षाचालक संघटनांचा १ डिसेंबरचा संप टाळण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील परिवहन कार्यालयात रिक्षाचालक संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. परिवहन मंत्री म्हणून कायद्याच्या चौकटीत उपलब्ध अधिकारांचा वापर करून चालकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे संपाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?