ठाणे

ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती; पहिल्या टप्प्यातील १४०० रुपये कोटी रुपयांची निविदा अंतिम टप्प्यात

ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'च्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'च्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी शुक्रवारी मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार नरेश म्हस्के यांनी बैठक घेतली. बैठकीत २०२९ पर्यंत 'ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. नुकत्याच दिल्लीत झालेल्या नगर विकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत नरेश म्हस्के यांनी कामाला गती मिळावी यासाठी मुद्दा उपस्थित केला होता.

खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी, मुख्य प्रकल्प अधिकारी सुनिलकुमार गर्ग, व्यवस्थापक प्रविण पापोळकर यांच्या समवेत कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली व प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. विविध सूचनाही करण्यात येऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'ची स्थानके अत्याधुनिक आणि आयॉनिक करण्याचे नियोजन असून त्यासाठी काही सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

२२ स्थानके उन्नत, तर २ स्थानके भूमिगत

१२ हजार २०० कोटींची मंजुरी असलेल्या हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा आहे. २६ कि.मी. जमिनीवरून तर ३ कि.मी. जमिनीखालून (भूमिगत) ही रेल्वे धावणार आहे. याच्या मार्गिका अंतिम करण्यात आल्या आहेत. एकूण २२ स्थानके उन्नत तर २ स्थानके भूमिगत असणार आहेत. भूमिगत असलेली स्थानके ही जुने ठाणे रेल्वे स्थानक आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानकांना जोडणारी असणार आहे. भूमिगत रेल्वे प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते. पहिल्या टप्प्यातील रायलादेवी ते बाळकूम नाका या २० किलोमीटर लांबीच्या कामासाठी १४०० रुपये कोटी रुपयांची निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

डेपो बांधणीच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात

ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पामध्ये वागळे इस्टेट, रोड नं. २२, लोकमान्य नगर, पोखरण रोड नं.१, पोखरण रोड नं.२, ग्लॅडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणा कॉलेज रोड, ठाणे स्टेशन या परिसरातून ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे. सीआरझेडच्या अडचणीमुळे बाळकुम नाका ते रायलादेवी मार्गाची निविदा ३ महिन्यांनी निघणार आहे. वडवली, कावेसर येथे ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाच्या डेपोचे सर्वेक्षण सुरू आहे. लोकांच्या काही तक्रारी सून त्या दूर करून डेपो बांधणीच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आली आहे.

डिसेंबर २०२९ चा मुहूर्त

डिसेंबर २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. काम सुरू असतांना विविध शासनाचे विभाग, ठाणे महापालिका, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण, महानगर गॅस, महावितरण या संदर्भातील अडचणींवर मात करण्याकरता सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो कामाचे लवकरच भूमिपुजन करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही रक्षण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बदलते ठाणे अंतर्गत विविध प्रकल्प ठाण्यात पूर्णत्वास येत आहेत. ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूककोंडीतून ठाणेकरांची मुक्तता होणार असून वेळेची बचत होणार आहे. पर्यावरणाचेही या प्रकल्पामुळे रक्षण होणार असून ठाणेकरांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या