Thane : सॅटिस पुलाच्या छतावर अडकलेल्या तरुणाची सुटका व्हिडिओवरून घेतलेले स्क्रीनशॉट
ठाणे

Thane : सॅटिस पुलाच्या छतावर अडकलेल्या तरुणाची सुटका, Video

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाच्या छतावर ३० वर्षीय तरुण अडकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Swapnil S

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाच्या छतावर ३० वर्षीय तरुण अडकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. संयुक्त प्रयत्नांतून तरुणाला सुखरूप खाली उतरविण्यात यश आले.

राम इंगोळे असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ८.५८ वाजण्याच्या सुमारास सॅटिस पुलाच्या छतावर एक व्यक्ती अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानंतर ठाणे नगर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.

पथकांनी आवश्यक खबरदारी घेत बचावकार्य सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर राम इंगोळे यांना सुरक्षितपणे छतावरून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यांना ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तो पुलाच्या छतावर कसा आणि कोणत्या कारणाने गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा; राम मॅन्शनच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत