ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात 
ठाणे

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दररोज लाखो वाहनांची गर्दी असते. हा नवा उंचावलेला मार्ग सुरू झाल्यावर या हायवेवरील वाहतूककाठी मोठा दिलासा मिळेल आणि प्रवास वेगवान व अधिक सुरक्षित बनेल.

Mayuri Gawade

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे ते घाटकोपर दरम्यान १३.९ किमी लांबीचा एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू केला आहे. हा पूर्णपणे उंचावलेला सहा लेनचा वेगवान मार्ग ठाणे आणि दक्षिण मुंबईतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार असून, हा प्रवास आता २५ ते ३० मिनिटांत पूर्ण होऊ शकेल. एमएमआरडीएने ही माहिती ‘एक्स’वर शेअर केली.

कुठून कुठपर्यंत असेल हा फ्रीवे?

हा नवा फ्रीवे ठाण्यातील आनंदनगरपासून सुरु होऊन घाटकोपरच्या छेडानगरपर्यंत जाणार आहे. मार्गात मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना हा वेगवान मार्ग जोडला जाईल.

ठाण्यात हा कॉरिडॉर आनंदनगर-साकेत एलिव्हेटेड रोडशी जोडला जाणार असून त्यामुळे समृद्धी महामार्गापर्यंतही सुलभ जोड मिळेल.

वाहतूक कोंडीला दिलासा

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दररोज लाखो वाहनांची गर्दी असते. हा नवा उंचावलेला मार्ग सुरू झाल्यावर या हायवेवरील वाहतूककाठी मोठा दिलासा मिळेल आणि प्रवास वेगवान व अधिक सुरक्षित बनेल.

एमएमआरडीएच्या मते, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांना जास्त आरामदायी, हरित आणि विश्वसनीय प्रवास मिळेल. तसेच मालवाहतूक आणि इतर प्रवास सुलभ झाल्याने संपूर्ण महानगर क्षेत्राचा आर्थिक विकासही गती घेईल.

पर्यावरणपूरक पाऊल - १२७ ‘पिंक ट्रम्पेट’ झाडांचे रक्षण

विक्रोळी-घाटकोपर मार्गावरील १२७ पिंक ट्रम्पेट झाडे जपण्यासाठी एमएमआरडीएने या भागाचा मार्ग बदलून पुनर्नियोजन केले आहे. तसेच ४,१७५ नवीन झाडांची लागवड करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
यामुळे वाहतूक सुविधा आणि पर्यावरण संतुलन यांचा सुंदर समन्वय साधण्याचा प्रयत्न दिसतो.

प्रकल्पातील तांत्रिक वैशिष्ट्ये

हा प्रकल्प अनेक तांत्रिक बाबींमुळे विशेष ठरणार आहे.

  • सिंगल पाइल-सिंगल पिअर सिस्टम वापरणारी ही मुंबईतील पहिलीच उंचावलेली रस्ता प्रकल्प रचना आहे.

  • २.५ मीटर डायामीटरचे मोनोपाइल्स, मजबूत पिअर्स, ४० मीटर स्पॅन आणि २५ मीटरचा सिंगल सेगमेंट सुपर-स्ट्रक्चर यांचा समावेश आहे.

  • मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी येथे अप-डाऊन रॅम्प्स बनवले जाणार आहेत.

  • नवघर फ्लायओव्हरजवळ प्रत्येक दिशेला तीन लेनचा टोल प्लाझा असेल.

कामाचा सध्याचा टप्पा

प्राथमिक सर्व्हे, टेस्ट पाइल्स आणि बहुतांश भूगर्भीय सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केबल-लाइन, पाइपलाइन यांसारख्या युटिलिटी ओळखण्याचे कामही जवळपास संपले आहे. आता पाइल्स आणि पिअर्स उभारण्याचे काम सुरू असून पुढील टप्प्यांवर एकाचवेळी काम गतीने चालणार आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत

Mumbai : ‘एआय’च्या मदतीने बनावट पासचे आणखी एक प्रकरण; तीन जणांवर गुन्हा दाखल, एसी लोकलमधून करत होते प्रवास