ठाणे

ठाणे : एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक; चालक, वाहकासह ११ प्रवासी जखमी

घोडबंदर रोडवर दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर रोडवर दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना घडली. या अपघातात वाहक आणि चालक यांच्यासह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. आंबेजोगाई येथून बोरिवलीच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतूक करत होती. त्यामध्ये वाहक आणि चालकासह एकूण १३ प्रवासी प्रवास करत होते. ही बसगाडी सोमवारी पहाटे ५.३० घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात आली असता, बसगाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये बसगाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या दुर्घटनेतील जखमींवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मेट्रोच्या कामामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

भारतात बनणार ‘सी-२९५’ विमाने; देशातील पहिल्या खासगी लष्करी विमाननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

२०२५मध्ये जनगणना; २०२६ मध्ये माहिती जाहीर करणार, जातनिहाय जनगणनेचा अद्याप निर्णय नाही

पोलिसांच्या मनमानीला चाप! बेकायदा अटकप्रकरणी नुकसानभरपाईचे आदेश; अधिकाऱ्यांच्या वेतनातून १ लाख दंडाची वसुली

Diwali 2024: फटाके फोडण्याची मर्यादा रात्री १० पर्यंत; प्रदूषण कमी होईल याची खबरदारी घ्या, BMC चे आवाहन

मला जेलमध्ये टाकणाऱ्यांचे सरकार आणणार का? एकनाथ शिंदे यांची मतदारांना भावनिक साद