Thane : खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू 
ठाणे

Thane : खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

ठाण्यातील रेतीबंदर परिसरातील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.

प्रतिनिधी

फरियाल सय्यद/ ठाणे/ भिवंडी :

ठाण्यातील रेतीबंदर परिसरातील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. ठाण्यात आलम सय्यद (४२), ठाकूरपाडा, मुंब्रा, रिझवान सय्यद (४२) ठाकूरपाडा, मुंब्रा, साहिल पोलंडास (३०) ठाकूरपाडा, मुंब्रा, अशी मृतांची नावे आहेत. रेतीबंदर येथील खाडीत हे तिघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याची खोली आणि जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना पाचारण केले.

कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी, ठाणे अग्निशमन दल, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्यासाठी अग्निशमन बंब, बचाव नौका आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या.

ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या पथकांसह आमची बचाव पथके नौकांसह घटनास्थळी पोहोचली. खाडीतील पाण्याचा प्रवाह आव्हानात्मक होता. मात्र, पथकांनी प्रयत्नांची शर्थ करत तिघांचाही शोध घेऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढले. सायंकाळीपर्यंत बचावकार्य पूर्ण झाले.”

कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, तिघांना रुग्णवाहिकेतून तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून अपघाती मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका

असंतोषाचा वणवा पेटवला जात आहे!