संग्रहित छायाचित्र एएनआय
ठाणे

ठाणे शहरात आढळले तीन कोरोना रुग्ण; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; कळवा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची उभारणी

ठाण्यात महापालिका क्षेत्रात कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्याने मुंबई, पुणे पाठोपाठ ठाण्यात देखील कोरोनाचा प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाण्यात महापालिका क्षेत्रात कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्याने मुंबई, पुणे पाठोपाठ ठाण्यात देखील कोरोनाचा प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून कळवा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

पाच वर्षांपूर्वी सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या तीन वर्षांपूर्वी आटोक्यात येऊन रुग्ण संख्या शुन्यावर आल्याचे चित्र असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे तीन रुग्ण गेल्या दोन दिवसांत आढळून आल्याने आरोग्य विभाग सर्तक झाला आहे. या रुग्णांसाठी पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे.

तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आणि कोरोना रुग्ण संख्या शुन्यावर येऊन परिस्थिती रुळावर आली. यानंतर शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊन सुरळीतपणे सुरू असतानाच, दोन वर्षानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे तीन रुग्ण गेल्या दोन दिवसांत आढळून आले आहेत. या तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरीच उपचार घेत आहेत. असे असले तरी अचानकपणे तीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सर्तक झाला आहे.

१९ खाटांचा स्वतंत्र कक्ष

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. हे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णांनाही अशी चाचणी करण्याचे आणि रुग्ण आढळल्यास त्याची माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १९ खांटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून त्यात १५ प्राणवायूच्या तर, ४ साध्या खाटा आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन