ठाणे

ठाण्यात पाणीबिल वसुली सुसाट! दोस्ती, ब्रह्मांड, लोढा गृहसंकुलांवरही कारवाई, एकाच दिवसात केली 'इतकी' वसुली, आतापर्यंत १२७ कोटी जमा

ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी मोठे गृहसंकुल, टॉवरांवर कारवाई करण्यात आली.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी मोठे गृहसंकुल, टॉवरांवर कारवाई करण्यात आली. ब्रह्मांड फेज तीन, लोढा क्राऊन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून ५० लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली.

पाणीबिल भरलेले नसल्याने दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणीपुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे, बाळकुम येथे लोढा क्राऊन आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली. संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे १३ लाख ५१ हजार रुपयांचा बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

पाणीपुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या २२५ कोटी रुपयांपैकी १२७ कोटी रुपयांची वसुली केली आहे. थकबाकीवरील प्रशासकीय आकार / दंड/ व्याज यांच्यावर लागू असलेली १०० टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंतच असल्याचेही पवार यांनी सांगितले.

...तर पाणीपुरवठा बंद करणार

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले.

वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश

मार्च अखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाने उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वात वर्तक नगर, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर, माजिवडा-मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबवली.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी